शिष्टाचार
वर्डप्रेस ओपन सोर्स प्रोजेक्टमध्ये, आम्हाला समजते की आमचा सर्वात मोठा संपत्ती म्हणजे आम्ही वाढवलेली समुदाय. प्रोजेक्ट, एकूणच, या मूलभूत तात्त्विक तत्त्वांचे पालन करतो द कॅथेड्रल अँड द बाजार.
- WordPress मुक्त-स्रोत प्रकल्पासाठी केलेले योगदान हे संपूर्ण WordPress समुदायाच्या फायद्यासाठी असते, विशिष्ट व्यवसाय किंवा व्यक्तींसाठी नाही. contributor म्हणून केलेली प्रत्येक कृती समुदायाच्या सर्वोत्तम हिताचा विचार करूनच केली पाहिजे.
- WordPress मुक्त-स्रोत प्रकल्पात सहभाग, क्षमता, कौशल्य, आर्थिक स्थिती किंवा इतर कोणत्याही निकषांशी संबंध न ठेवता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी खुला आहे.
- वर्डप्रेस ओपन सोर्स प्रोजेक्ट हा स्वयंसेवकांद्वारे चालणार समुदाय आहे. कंपन्यांद्वारे योगदानकर्त्यांना प्रायोजित केले जाते अशा प्रकरणांमध्येही, तो वेळ संपूर्ण ओपन सोर्स समुदायाच्या फायद्यासाठी दान केला जातो.
- समुदायाचा कोणताही सदस्य त्यांचा वेळ दान करू शकतो आणि प्रकल्पात कोणत्याही स्वरूपात योगदान देऊ शकतो, जसे की डिझाइन, कोड, डॉक्युमेन्टेशन, समुदाय निर्माण इत्यादी. अधिक माहितीसाठी, येथे जा make.wordpress.org.
- WordPress मुक्त-स्रोत समुदायाला विविधतेची काळजी आहे. संवाद भेदभाव, हिंसेला चिथावणी, द्वेषाचा प्रसार, आणि अस्वागतार्ह वर्तन यांपासून मुक्त ठेवून प्रत्येकाला समाविष्ट वाटेल असे स्वागतशील वातावरण राखण्याचा आम्ही प्रयत्न करतो.